हवामान पूर्व सूचना
भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांचे कडून प्राप्त माहितीनुसार दिनांक 13/10/2020 ते 17/10/2020 यां कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
विशेषतः किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात येत आहे.
- समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारी साठी खोल समुद्रात जाऊ नये.
- अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सखल भागात नागरिकांनी सतर्क रहावे.
- विजांचा कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये. विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तू पासून दूर रहावे.
- सुखे अन्न पदार्थ, बॅटरी, पुरेस औषधे, पिण्यासाठी पाणी इ. व्यवस्था करण्यात यावी.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
जिल्हा नियंत्रण कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड
फोन – 02141 222118 / 8275152363