आर. आर. पाटील म्हणजेच आबा. लोक त्यांना प्रेमाने आबाच म्हणायचे. तब्बल १२ वर्षे ज़िल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. अंबाना त्यांच्या स्वच्छ प्रतिमा, समंजस नेतृत्व, साधेपणा, कोणताही बडेजावपणा अंगी नसलेला माणूस म्हणून शेवटपर्यंत त्यांना ओळखले गेले. त्यांनी कधीही आबाचा आबासाहेब केला नाही.

१९९९ साली युतीचे सरकार जाऊन काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळची आबांच्या बाबतीतला गंमतीदार प्रसंग:

मंत्रिमंडळ स्थापन होणार होते त्या आदल्या रात्री आबा आपल्याच जिल्ह्यातील जेष्ठ नेते विष्णूआण्णा यांना मंत्रिपद मिळू शकेल आणि आपण काय त्या लेवलपर्यंत जाऊ शकणार नाही म्हणून निर्धास्त झोपले होते. त्याच रात्री १:३० वाजता त्यांना शरद पवार यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले आर. आर. उद्या तुम्हाला मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे.

साहेबांचा कोणतरी आवाज काढून आपली चेष्टा करतंय असे वाटले म्हणून त्यांनी लगेच दिलीप वळसे पाटील यांना फोन केला. मला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे असा फोन आला होता हे खरं आहे का? दिलीप वळसे सुद्धा त्यांना म्हणाले मलाही असाच फोन आला होता.

आता नक्की विश्वास ठेवावा कि काय करावं म्हणून आबांनी अजितदादांना फोन केला. “आपण आता अजितदादांकडून खात्री करून घेऊ, त्यांचा आवाज मला दिवसा-रात्री कधीही फोन केला तरी सारखाच वाटतो.”

अंबानी म्हटलं “दादा, साहेबांसारखा आवाज काढत कोणीतरी मंत्रिपदाच्या शपथीसंदर्भात फोन केला आहे हे खरं आहे का?” तेव्हा अजित पवार यांनी त्यांना सांगितलं कि होय हे खरं आहे, तुम्ही मंत्री होणार आहात.

मंत्री होणार म्हटलं कि सहाजिकच आहे प्रत्येकाला वाटू शकतं कि आपल्याला कोणतं खातं मिळणार आहे, परंतु आबांनी ठरवलं कि स्वप्नात ज्याचा विचार केला नाही ते आपल्याला साहेबांमुळे मिळालंय त्यामुळे जे खाते मिळेल त्यात जीव ओतून काम करायचं.

त्यावेळी त्यांना ग्रामविकास आणि पाणीपुरवठा हे खातं निश्चित केले. त्यावेळी त्यांचे संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान गाजले. त्यांनी सुरु केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची दखल संयुक्त राष्ट्रसंघानेही घेतली होती.

कोणतीही राजकीय पार्शवभूमी नसतानाही आपले काम, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमतेमुळे आबांनी यशाची उंची गाठली. आबा उपमुख्यमंत्री व्हावे म्हणून त्यांचे नाव सुचवणारी पहिली व्यक्ती हे अजित पवार होते.

गृहमंत्री असताना आबांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवले. डान्सबार बंदी करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. नक्षलग्रस्त भाग गडचिरोलीचे पालकमंत्री झाले, आदिवासी मुलांना दत्तक घेऊन शिक्षणाची जबाबदारी घेतली.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version