corona amount

सध्या सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये प्रत्येक कोरोना पेशंटमागे महापालिका आणि नगरपालिकांना केंद्र सरकार तर्फे दीड लाख रुपये मिळतात असा दावा केला जात आहे. परंतु हा दावा खोटा असून कोणत्याहीप्रकारे दीड लाख रुपये पालिकांना दिले जात नाहीत.

आकाशवाणी संकेतस्थळावरील बातमी

आकाशवाणी तसेच सामना वृत्तपात्राच्या संकेतस्थळावरील बातमीमध्ये हि पूर्णतः अफवा असून कोरोना पेशंट रुग्णांनी अफवांना बळी न पडता उपचार करून घ्यावेत असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले असून अफवा पसरवणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे त्यांनी नमूद केले.

सामना वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील बातमी

तसेच प्रशासनाने तयार केलेल्या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवरती पूर्णतः मोफत उपचार केले जात असून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे अफवांवरती विश्वास न ठेवता रुग्णांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि योग्य वेळेत निदान करून घ्यावे.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version