आतापर्यंत आपण जगातील ७ आश्चर्यांबद्दल जाणून आहोतच. ताजमहालसुद्धा जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे. याच आधारे महाराष्ट्रातसुद्धा ‘सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र’ म्हणून एकूण १४ ठिकाणांपैकी ७ स्थळे २०१३ साली मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर निश्चित करण्यात आलेली आहेत.
महाराष्ट्रात अद्भुत स्थळांची कमी नाही. एकूण ४०० स्थळे निवडली गेली होती त्यातील १४ स्थळे निश्चित केली गेली. स्पेशल ज्युरी श्री. जगदीश पाटील, अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, अरविंद जामखेडकर, निशीगंधा वाड, विकास दिलावरी, व्ही. रंगनाथन या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर असणाऱ्या या सात ज्युरींनी ४००मधून १४ निश्चित केली व २२ लाख लोकांच्या मतदानाद्वारे अंतिम ७ आश्चर्यांची निवड करण्यात आली.
पाहूया आपल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्ये:
१. रायगड किल्ला:
स्वराज्याची राजधानी आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असा अजिंक्य रायगड किल्ला हा आता या ७ आश्चर्यांपैकी १ लोकांनी निवडून दिलेले स्थळ आहे.
२. लोणार सरोवर (बुलढाणा):
लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून त्याची निर्मिती उल्कापातामुळे झाली होती. असंख्य पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.
३. अजिंठा लेणी (औरंगाबाद):
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणी इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या एकूण २९ बौद्ध लेणी आहेत. प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणारी महत्त्वपूर्ण लेणी आहेत त्यास देश-विदेशातील असंख्य प्रेक्षक भेट देत असतात.
४. कास पठार (सातारा):
कास पठारावरती अनेक दुर्मिळ रानफुले आढळतात तसेच त्यावरील तलावातील पाणी सातारा शहराला पुरवले जाते. युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत कास पठाराचा समावेश २०१२ साली करण्यात आला आहे.
५. दौलताबाद किल्ला (औरंगाबाद):
हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून हा यादवकालीन ऐतिहासिक किल्ल्याची शाळांच्या पाठयपुस्तकात देखील माहिती दिली असून प्रेक्षक जास्त संख्येने हा किल्ला पाहायला जात असतात.
६. विश्व विपस्सना पॅगोडा (बोरिवली, मुंबई):
मुंबईती, बोरिवलीतील गोराई येथे जगातील सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा उभारण्यात आला आहे. बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक व्हावी या हेतूने २००० साली प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे. तसेच विपस्सना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. कोरोना आधीच्या काळात दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट देत असत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या वेळी पर्यटक संख्या ५ हजारांपेक्षा जास्त असते.
७: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT, मुंबई):
सन १८८८ ला उदघाटन करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. एकूण १८ प्लॅटफॉर्म असून १-८ लोकल ट्रेन व इतर लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी वापरण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे आता महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांमधील एक असे ठिकाण ओळखले जाते.
तसेच जगातील ७ आश्चर्यांची फोटो गॅलरी पहा: