Covid-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती शासनाने जाहीर केलेल्या कॅशलेस व डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे ओटीसी (over the counter) योजना चालू करण्यात येत आहे.

विविध सवलतधारी प्रवासी व महामंडळाच्या विविध योजना (सर्व्हिस पास, आवडेल तेथे प्रवास) अशा प्रवाशांकरिता महामंडळामार्फत स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. या कार्डची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

  • ओटीसी कार्ड हे इतर स्मार्टकार्डसारखे असून कार्डवर कोणत्याही प्रकारचा फोटो किंवा नाव नसून अवैयक्तिक कार्ड आहे.
  • सदरचे कार्ड हे मे. ट्रायमॅक्स कंपनीच्या खाजगी एजंटकडून उपलब्ध होणार असून सदर कार्ड महामंडळाच्या बस स्थानकावर उपलब्ध नसेल.
  • ओटीसी कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी प्रवाशाचे नाव व मोबाईल नं घेऊन खाजगी एजंट तात्काळ कार्ड उपलब्ध करून देईल.
  • यामध्ये ट्रॅव्हल व शॉपिंग वोलेट यांचा समावेश असून कुटुंबातील सर्व सदस्य या कार्डचा वापर करू शकतील.
  • प्रवाशांनी हे ओटीसी कार्ड वाहकाला दाखवून कोणतेही ओळखपत्र दाखविण्याची किंवा पैसे देण्याची आवश्यकता नाही. कार्डमध्ये उपलब्ध असलेल्या रक्कमेतुन तिकीटाची रक्कम वजा होईल.

सध्या महामंडळ किंवा ट्रायमॅक्स कंपनीतर्फे संपूर्ण माहिती सादर झाली नाही. परंतु माहिती प्रसारित झाल्यावरती आम्ही आपल्यापर्यंत सर्व माहिती लवकरच सादर करू.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version