अलिबाग, जि.रायगड, दि.22/10/2020:

ऑक्टोबर 2020 मध्ये रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.

अदयापही शासकीय यंत्रणा पंचनामा करण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचली नसेल, तर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खालील गुगल लिंकवर नुकसानीचा अर्ज भरावा.

https://docs.google.com/…/1W944r3a8eXfK_H8V8zEiOhl7vLD…/edit 

तसेच ज्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, त्यांनीच हा अर्ज भरावा, याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version