राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर राजकारणापासून दूर असणाऱ्या सोनिया गांधी काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी राजकारणात सक्रिय झाल्या. थेट काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षही झाल्या. काँग्रेस पक्षाच्या त्या अध्यक्ष व्हाव्यात यासाठी शरद पवारसुद्धा पाठिंबा देत होते परंतु मूळ परदेशी असणारी व्यक्ती पंतप्रधान पदाचा दावेदार असता कामा नये असा मुद्दा त्यांनी मांडला.

परदेशी असल्याने निवडणुकीत काँग्रेस पक्षाला राजकीय किंमत मोजावी लागू शकते यासाठीच्या शरद पवार यांच्या मुद्द्याला पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनीही पाठिंबा दिला होता. यासाठी तिघांनाही ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले.

काँग्रेस नेतृत्वाला लोकभावना बोलून दाखविलेल्या आवडत नाहीत तसेच निलंबनाच्या कारवाईवरून राज्यात आणि देशात तीव्र पडसाद उमटू लागले. त्यामुळे शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचे ठरवले.

काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील अनेक नेत्यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. काँग्रेस विचारांचा पर्याय म्हणून १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचे ठरले आणि चरखा या निवडणूक चिन्हासाठी मागणी करण्यात आली होती.

अखेर राष्ट्रवादी पक्ष स्थापन होऊन राष्ट्रीय जबाबदारी शरद पवार यांनी घेतली आणि राज्यातील पाहिले राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली.

घड्याळ चिन्ह कसे मान्य झाले :

निवडणूक आयोगाने पक्षाला मान्यता दिली परंतु चरखा चिन्हाला मान्यता न देता दुसरे चिन्ह सुचविण्यास सांगितले.

जेव्हा राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेसाठी षण्मुखानंद हॉलमध्ये बैठक सुरु करण्यात आली होती त्यावेळेस घड्याळात बरोबर दहा वाजून दहा मिनिटे झाली होती. म्हणून हे वेळ दाखविणारे घड्याळ म्हणून या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version