३० जानेवारी २००३ रोजी शिवसेनेचे महाबळेश्वर येथे अधिवेशन भरवले होते आणि बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण याचीही उत्सुकता शिवसैनिकांना लागली होती.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी स्वतः राज ठाकरे यांनी कार्यध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि सर्वांनाच या निर्णयाचा धक्का बसला. शिवसैनिक आणि नेते शांतच बसले होते कोणाला वाटत होतं राज ठाकरे कार्याध्यक्ष होतील किंवा दोघा भावांना संघटनेत सामान स्थान मिळेल.

दोन्ही भावांमध्ये मतभेद आहेत, राज ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे अशाप्रकारच्या बातम्या मीडियासुद्धा देऊ लागले होते. राज ठाकरेच बाळासाहेबांचे वारसदार असतील अशी चर्चा असताना अचानक उद्धव ठाकरें कार्याध्यक्ष कसे झाले याची खरं तर सुरुवात १९९५ पासून झाली.

  • १९९५ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि राज ठाकरे यांनी कामाचा धडाकाच लावला.
  • त्याच दरम्यान रमेश किणी प्रकरणात CBI चौकशी झाली. ठोस पुराव्यांअभावी ते निर्दोष सुटले परंतु राजकीय विश्लेषकांच्यानुसार ते राजकारणात ५ वर्षे मागे लोटले गेले.
  • १९९७ साली उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झाले. २००२ साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांकडे सोपविली.
  • तेव्हापासून राज ठाकरेंच्या समर्थकांची तिकिटे कापणे, जवळच्या लोकांना डावलणे असे प्रकार सुरु झाले.
  • राज ठाकरेंना भाविष्याची चिंता होती तर उद्धव ठाकरे यांना आपले स्थान आणखीन भक्कम करायचे होते म्हणून त्यांनी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवत हिंदुत्वाचा मुद्दा ठळक केला आणि मुंबईत संजय निरुपम यांच्या साहाय्याने उत्तर प्रदेश मते वाढविण्यास भर दिला.
  • त्यावेळेसच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली व त्यानंतर पक्ष सोडला. त्यामुळे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात शाब्दिक चकमकी व राडे सुरु झाले.
  • राणे गेल्यामुळे बाळासाहेब यांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्र राज्याचा दौरा करण्यास पाठवले. त्यावेळेस राज यांनी सिंधुदुर्गात जाणे टाळले म्हणून सामना वृत्तपत्रातूनच त्यांच्यावरती टीका करण्यात आली.
  • २००४ साली आघाडीची सत्ता पुन्हा आली, १६ ऑक्टोबर २००५ साली कणकवली मतदारसंघात पोटनिवडणूक असताना बाळासाहेबांची सभा होती त्या सभेलासुद्धा राज ठाकरे यांनी अनुपस्थिती दाखविली. निकाल राणेंच्या बाजूने लागला.
  • उद्धव ठाकरेंचे निर्णय राज ठाकरे यांना पटत नव्हते, निर्णय प्रक्रियेवेळी त्यांना दूर ठेवले जात असे. पाहिजे तितकं स्वातंत्र्य दिले जात नव्हते, एकप्रकारे कोंडमारा सुरु झाला होता.
  • शेवटी २७ नोव्हेंबर २००५ ला राज ठाकरे यांनी शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिला. परंतु पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला नव्हता.
  • अखेर १८ डिसेंबर २००५ रोजी राज यांनी अधिकृतपणे शिवसेना पक्ष सोडण्याची घोषणा केली. बाळासाहेबांनी राज यांची समजूत काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला.
  • मनोहर जोशी व संजय राऊत यांना राज यांची समजूत काढण्यासाठी कृष्णकुंजवरती पाठवले. त्यावेळेस राजसमर्थकांनी संजय राऊत यांची गाडी जाळली होती.
  • शिवसेना सोडल्यानंतर राज यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि ९ मार्च २००६ साली यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार परिषद घेऊन नवीन पक्ष व पक्षाचा झेंडा जाहीर केला.
  • १६ मार्च २००६ ला राज यांनी पक्षाची पहिली सभा शिवाजी पार्क येथे घेतली आणि लाखोंचा जनसमुदाय त्यावेळेस उपस्थित होता.
  • त्यानंतर त्यांनी मराठीचा मुद्दा ठळक केला आणि महाराष्ट्र धर्म नावाची संकल्पना मांडली. २००७ साली मुंबई महानगरपालिकेत ७ नगरसेवक निवडून आले आणि २००९ च्या विधानसभेत १३ आमदार निवडून आले.
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version