सोमवार 16 नोव्हेंबर दिवाळी पाडवादिनी राज्य शासनाने सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे खुली करण्याचे आदेश दिले त्यामुळे दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार खबरदारी म्हणून मंदिर समितीमार्फत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

पांडवांनी स्थापन केलेल्या या मंदिराला दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते तसेच हे मंदिर समुद्रकिनारी आहे. राज्यभरातून असंख्य भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देत असतात.

कोरोनाच्या या संकटकाळामुळे मंदिरात एकावेळी फक्त 5 जणांना प्रवेश दिला जात असून लहान मुले, वयोवृद्ध आणि गर्भवती महिलांना प्रवेशबंदी आहे.

तसेच भाविकांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारक केलेले आहे.

 


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version