भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतेच एक वक्तव्य केले कि, दोन महिन्यांत महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि पुन्हा भाजपचे सरकार येईल. परंतु यांच्या या वक्तव्याचीराष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे.

दानवे ज्योतिष शास्त्राचे जाणकार असल्याचा आणि उद्याचे चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता.

-शरद पवार


भाजपचे माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आज राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषदेत दानवेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आज (२४ नोव्हेंबर २०२०) ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरु झालेले दिसत आहे.



लोकांच्या प्रश्नाची उत्तरं न देता राजकीय विरोधकांच्या विरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे.’ अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version