खुशखबर! पुण्याहून सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनाची लस रायगडात दाखल झाली आहे. दोन टप्प्यात हे लसीकरण होणार असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे. सध्या रायगड जिल्ह्यात एकूण 9 हजार 600 लसीचे डोस आले आहेत.
ठाणे जिल्ह्यातून ही कोव्हिड व्हॅक्सिन रायगड जिल्ह्याकडे पोलीस बंदोबस्तात दाखल झाली आहे. 16 जानेवारी 2021 रोजी अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय व कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण होणार आहे. तसेच एमजीएम कामोठे, वायएमटी हॉस्पिटल पनवेल येथे येथे नगरपालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण होणार आहे.
16 जानेवारीला 100 लाभार्थी याचा लाभ घेतील. नंतर पुन्हा 28 दिवसानंतर त्यांनाच दुसरा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.