रविवार ३१ जानेवारी २०२१ 73व्या ‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. त्यावेळेस 26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत त्यांनी भाष्य केलं. लाल किल्ल्यावर झालेला तिरंग्याच्या अपमानाने संपूर्ण देश दु:खी असल्याचं मोदी म्हणाले.


26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी काही लोकांनी लाल किल्ल्यावर ज्याठिकाणी पंतप्रधान दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला झेंडा फडकवतात त्याठिकाणी, निशान साहिब यांचा झेंडा फडकवला होता.



शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा पंतप्रधानांवर पलटवार.



तिरंगा केवळ पंतप्रधानांचा आहे का? असा सवाल करत त्यांनी, संपूर्ण देशाचं आपल्या तिरंग्यावर प्रेम आहे. ज्याने तिरंग्याचा अपमान केला त्याला पकडलं जावं अशी मागणी केली आहे. ज्याने कोणी तिरंग्याचा अपमान केला आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घ्या, अशी प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी दिली आहे.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version