भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या भव्या लाल यांची ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या प्रमुख पदावर निवड झाली आहे. त्यांच्याकडे अभियांत्रिकी आणि अवकाश तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांचा प्रचंड अनुभव आहे.



भव्या लाल या अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रेसिडेन्शियल ट्रान्झिशन एजन्सीचा भाग होत्या. साल 2005 पासून जवळपास 15 वर्षं भव्या यांनी अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स अॅनालिसिस सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी इन्स्टिट्यूट या संस्थेत संशोधक म्हणूनही काम केलं आहे.



नासाच्या अॅक्टिंग चीफ ऑफ स्टाफ या प्रमुख पदावर निवड होण्याआधीपासूनच त्यांनी अवकाश संशोधन, तंत्रज्ञान, वातावरणाशी निगडित संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. नासाशिवाय त्यांनी संरक्षण संबंधित विभागांमध्येही काम केलं आहे.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version