आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथे आयोजित केलेल्या क्रिकेटच्या सामन्यांत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याने चौघांविरोधात दिघी सागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दिघी सागरी पोलीस ठाण्यात नवीन नियुक्ती झालेल्या सहा पोलीस निरीक्षक यांनी हा गुन्हा दाखल केला असून याबाबत संदीप चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मास इलेव्हन क्रिकेट मंडळाने भरडखोल येथे क्रिकेटचे सामने भरवले होते. यामध्ये शासनाने घालून दिलेला निर्देशाचे पालन न करता जवळपास शंभर ते दीडशे जणांना एकत्र आणले.



याद्वारे कोरोना रोगाचे प्रसार होण्याचा ठपका ठेऊन क्रिकेट मंडळाच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतून नुकतीच नियुक्ती दिघी पोलीस ठाण्यात बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी नियुक्तीच्या दोनच दोनच दिवसांत हा गुन्हा दाखल करत आपल्या कामाची चुणूक दाखले आहे. याचा धसका स्थानिक पुढाऱ्यांनी घेतला आहे.



विनापरवानगी क्रिकेटचे मॅचेस आयोजन करणे आणि कोणत्याही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याने कलम 188, 269, 290, भादंवि 135 बीपी ऍक्ट तसेच साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2, 3, 4 अन्वये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version