आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणातील स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट राहिलेल्या सचिन वाझे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.



९०च्या दशकापासून मुंबई पोलिसांचे हे एन्काउंटर स्पेशालिस्ट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवण्यात मोलाचा वाटा असणारे इतर मराठी एन्काऊंटर स्पेशालिस्ट माहिती आहेत का?



९० च्या दशकात दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरूण गवळी, नाईक गॅंग मुंबईत दिवसाढवळ्या धमकी, खंडणी, खून रक्तपात करत होते आणि यामुळे मुंबई शहर गॅंगवॅारने अगदी हादरून गेलं होतं.

मुंबईत वाढत्या गँगवार आणि गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी १९९७ साली सरकारने ठोस पाऊल उचलून पोलिसांना थेट कारवाईचे आदेश दिले आणि यातूनच मुंबईतील एन्काउंटर स्पेशालिस्टचा जन्म झाला. गुन्हेगारी थांबावी तसेच गुन्हेगार दहशतीखाली यावेत म्हणून पोलिसांनी आपली पिस्तुले बाहेर काढली.



गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 1997 च्या आसपास सरकारने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. गुन्हेगारांवर दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आपली आता पिस्तुलं बाहेर काढली आणि मुंबईत एन्काउंटर सुरू झाले. मुंबईत हळूहळू गँगवार कमी होऊ लागले आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट चर्चेत येऊ लागले.

१९८३ सालची बॅच आत्तापर्यंतची सर्वात वजनदार बॅच मानली जाते, या बॅचमधून दया नायक, प्रफुल्ल भोसले, रवींद्र आंग्रे, विजय साळसकर, प्रदीप शर्मा यांसारखे एन्काउंटर स्पेशलिस्ट तयार झाले



कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अरविंद इनामदार यांनी अथक परिश्रम घेऊन NDA व इतर लष्करी अकेडमीसारखे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ट्रेनिंगचे नवीन साहित्य आणले तसेच देहबोली, जेवण्याची पद्धत अशा अनेक सवयी बदलल्या आणि MPSC पास झालेल्या तब्बल २००जणांना ट्रेनिंग दिली. मुंबईत अंडरवर्ल्डची डोकेदुखी १९८३ च्या बॅचने तब्बल १००० गँगस्टर्सना ठोकले.

  1. सचिन वाझे:


१९९० साली सचिन वाझे सब-इन्स्पेक्टर म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस दलात रुजू झाले. ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी एकूण ६३ गुन्हेगारांचे एन्काउंटर केले. २००२ साली झालेल्या ख्वाजा युनूस फेक एन्काउंटरप्रकरणी २००४ साली पोलीस दलातून निलंबित केले. पून्हा ते सेवेत रुजू झाले आणि सध्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणातील स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

. दया नायक:



दया नायक यांनी आत्तापर्यंत ८८ जणांचा एन्काउंटरमध्ये खात्मा केला आहे. 1995 मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. प्रदीप शर्मासोबत दया नायक यांनी क्राइम ब्रांचमध्ये काम सुरू केलं. 1998-99 पासून एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.



बेहिेशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत लिंक असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली व निलंबन केले. पुन्हा दया नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आलं. सध्या दया नायक मुंबई एटीएसच्या चंदनचौकी युनिटचे प्रमुख आहेत.

३. प्रदीप शर्मा:

प्रदीप शर्मा हे महाराष्ट्र पोलिसांच्या 1983 च्या बॅचचे अधिकारी आहेत. शर्मा यांनी 100 पेक्षा जास्त एन्काउंटर केल्याचं बोललं जातं. 2006 मध्ये अंधेरीत लखन भैय्या नावाच्या छोटा राजनच्या शार्प शूटरचं मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केलं. पण, या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.



लखन भैय्याला फेक एन्काउंटरमध्ये ठार केल्याचा आरोप करण्यात आला. प्रदीप शर्मा यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना फेक एन्काउंटर प्रकरणी अटक करण्यात आली. 2013 मध्ये कोर्टाने प्रदीप शर्मा यांची निर्देोष मुक्तता केली व त्यानंतर प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर 2014 मध्ये निवडणूकसुद्धा लढवली होती.

४. रवींद्र आंग्रे:



रवींद्र आंग्रे हे सुद्धा प्रदीप शर्मा यांच्यासोबतचे 1983 बॅचचे पीएसआय होते. सुरेश मंचेकर आणि अमर नाईक गॅंगला संपवण्याचं श्रेय आंग्रे यांना दिलं जातं. 2008 साली ठाण्यात एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आरोप रवींद्र आंग्रे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी आंग्रे यांची चौकशी करण्यात आली. त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. रवींद्र आंग्रे यांनी भाजप आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version