आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. म्हणूनच २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणून भारतात साजरा केला जातो.
भारतातील जातीव्यवस्थेमुळे स्वतःला उच्च समजणारे अस्पृश्यांना वेगळे वागवत असत. शाळा, दवाखाने तसेच पाण्याच्या मुख्य स्रोतापासून अस्पृश्यांना दूर ठेवले जाई. इतर कोणी सामाजिक भान असणाऱ्या हिंदूने जरी मदत केली तरी त्या व्यक्तीलासुद्धा अस्पृश्य मानले जाई.
ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय घेतला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांचा म्हणजेच अस्पृश्यांचा ही वहिवाटीचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेनेसुद्धा जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय घेतला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती.
अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचारविनिमय करून १९ व २० मार्च रोजी महाड येथे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला.
कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांनीही बाबासाहेबांना याबाबतीत मदत केली.
१९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले. बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्ष ऐकता येतील म्हणून बऱ्याच तरुण आणि स्त्रियांनी सभेला हजेरी लावली. त्यावेळेस सभेसाठी ५००० लोक जमले होते.
यावेळेस सभा झाल्यानंतर आधी बाबासाहेबांनी चवदार तळ्याचे पाणी चाखले आणि त्यानंतर आलेले सर्व लोक चवदार तळ्याचे पाणी प्यायले.
सभेसाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. त्यावेळेस अस्पृश्य पुरुष हातात कायम काठी बाळगत असत, तर स्त्रिया गुडघ्यापर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सभेत आवाहन केले कि पुरुषांना हातात आता काठी बाळगणे गरजेचे नाही तसेच स्त्रियांनीसुद्धा इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पुर्ण टाच घोळ लुगडे नेसावे. याची अंमलबजावणी लगेचच पुढच्या काही दिवसांत दिसून आली. हा चवदार तळे सत्याग्रह तत्कालीन समाजव्यवस्थेला कायमचा छेद देणारा ठरला.
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group