काही दिवसांपूर्वी आपण वर्तमानपत्रातून वाचले असेल की, सरकारी नोकऱ्या कमी होणार आहेत, खाजगी कंपन्या यांत्रिकीकरण व ऑटोमेशन वर भर देत आहेत, त्यामुळे नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे . म्हणूनच तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा आता नोकरी देणारे बनण्याची गरज आहे .वाढत्या बेरोजगारी वर व आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी एकमेक उपाय म्हणजे “शेतकरी उद्योजकता”.



शेतकरी उद्योजक म्हणजे नेमके काय, व्यवसाय निवड कशी करावी, त्याचे प्रशिक्षण कोठे मिळेल, यासारखे असंख्य प्रश्न आपल्या मनात येत असतील. म्हणूनच आपल्या या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी व उद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक आगळी वेगळी संकल्पना.कोकण ग्रीन अॅग्रो प्रो. कं. ची संकल्पना.



कोकण ग्रीन अॅग्रो प्रो. कं. ही एक शेतकरी उत्पादक कंपनी असून शेतकरी व तरुण वर्गाचा विकास हे या कंपनीचे ध्येय आहे . शेती व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि नैसर्गिक संकटांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे .प्रत्येक शेतकरी कुटुंबातून एक तरी यशस्वी व प्रतिष्ठित कृषीपुरक व्यवसाय उद्योजक तयार व्हावा या उद्देशाने कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.


कंपनीची उद्दिष्ट्ये.

  1. कृशिविस्तार सेवांमध्ये सुधारणा करणे.
  2. शेतकऱ्यांना संघटित करून अडचणींवर मात करणे.
  3. विविध प्रकारचे तंत्रज्ञान, माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे.
  4. शहरातील ग्राहक डोळ्यासमोर ठेवून दर्जेदार शेतमालाचे उत्पादन करणे.
  5. शेतीची उत्पादन क्षमता , उत्पादनांची गुणवत्ता आणि रोजगाराच्या संधी वाढविणे .
  6. शेतकऱ्यांना बाजारपेठेत मालाच्या विक्रीसाठी चांगल्या संधी निर्माण करून देणे.
  7. बाजार व्यवस्था सुधारणे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे.
  8. सदस्यांना यंत्रसामग्री , उपकरणे किंवा उपभोग वस्तूंचे उत्पादन ,विक्री किंवा पुरवठा याचे मार्ग खुले करणे.
  9. सदस्य आणि इतरांना परस्पर सहाय्य तत्वांचे शिक्षण प्रदान करणे.
  10. अद्यावत दूध व दुग्धजन्य उपपदार्थ निर्मिती उद्योग उभारणार.
  11. उत्पादीत कृषि मालाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी , ऊर्जेची बचत व्हावी , यासाठीच्या प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे.

सभासदांना मिळणाऱ्या योजना:

  1. व्यवसाय निवड मार्गदर्शन.
  2. व्यवसाय प्रशिक्षण.
  3. विविध व्यावसायिक आवश्यक कागदपत्रे.
  4. व्यवसाय स्थापना.
  5. व्यावसायिक भांडवल पुरवठा.
  6. शासकीय अनुदानित योजनांचा लाभ.
  7. उत्पादन निर्मिती मार्गदर्शन.
  8. उत्पादन विक्री प्लॅटफॉर्म.
  9. महिला बचत गटांना प्रोत्साहन. व इतर बरेच काही…

अधिक माहितीसाठी संपर्क: 8097652362

कॉल करण्यासाठी नंबरवर क्लिक करा- 8097652362

चला तर ! आजचं सभासद नोंदणी करा व उद्योग जगतात पदार्पण करा.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version