आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
माणगांव तालुक्यातील पॉस्को कंपनीच्या सीएसआर फंडातून जिल्ह्यातील शासकीय कार्यालये व इतर घटकांकरिता २ लाख मास्क आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पॉस्को कंपनीचे संचालक व्यवस्थापक नाम हैंग हिओ, मॅनेजर सुधीर भोसले, जनरल मॅनेजर कांग हि चोई, डेप्युटी मॅनेजर किशोर पाटील उपस्थित होते.
करोना संकटावर मात करण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पोस्को कंपनीने केलेले हे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांचा आदर्श घेऊन इतर कंपन्या व सामाजिक संस्था यांनीदेखील आरोग्य यंत्रणेला हातभार लावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले असून सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पोस्को कंपनीने केलेल्या योगदानाबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोस्को कंपनीचे आभार मानले. यापूर्वीही पोस्को कंपनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महाराष्ट्रातील अनेक प्रसंगात अनेकांच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून गेली आहे.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार पॉस्को कंपनीकडून देण्यात आलेल्या KF 94 या २ लाख मास्कपैकी जिल्हाधिकारी कार्यालय १ लाख, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ३० हजार तसेच जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालये व इतर घटकांकरीता ७० हजार KF 94 मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group