चला सावरुया पृथ्वीवरच्या स्वर्गला…मागील काही दिवसांपासून कोकणातील महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, रत्नागिरी या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे होत्याच नव्हत झालं, एका रात्रीत माणसं बेघर झाले,संसार उध्वस्त झाले. त्यांना ह्या संकटातून सावरण्यासाठी प्रयत्न Social Foundation, सेवा सारथी, आम्ही गडगोंधळी, Humanity Central, गोळेगणी ग्रामस्थ ह्या संस्थांच्या सर्व कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मदतीचा हात देण्यासाठी आवाहन केले.
अवघ्या चार दिवसात नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यांनी 150 जीवनावश्यक वस्तूंचे किट, 40 बिस्कीटचे बॉक्स, 100 पाणी बॉटल बॉक्स इत्यादी साहित्य त्यांनी जमा केले, त्यांनी दोन वेगळे टेम्पो केले, एक टेम्पो चरई, पोलादपूर आणि दुसरा टेम्पो जुगाईवाडी,सातारा. या ठिकाणी गुरूवारी सकाळी 5 वाजता घेऊन गेले, त्या गावात गेल्यानंतर त्या गावातील लोक अक्षरशः रडत होती, त्यांना अजुनही मदतीची गरज आहे.
आपण लवकरच मदतीसाठी जाणार आहोत, आपल्याला अजूनही मदत करायची असेल तर आपण आम्हाला संपर्क करावा-7972588311 असे आवाहन पिपंरी चिंचवड परिसरातील तरुणांनी केले आहे.
या मदत पथकात अजय अनिलराव मोरे, ओंकार गंगाधर मांडगे, जयेश अनिलराव मोरे, गणेश संजय धुमाळ, सुदर्शन नागेश पाटील, सौरभ संतोष गुरव, आर्यन महाजन, चैतन्य गावडे, श्वेता सरनाईक आणि कार्यकर्ते होते.दिनेश दरेकर आणि देऊळवाडी, गोळेगणी गावच्या नागरिकांनी आम्हाला गरजू गावापर्यंत पोहचवण्यासाठी मदत केली.
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group