दि. 22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरस्थितीचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत सुरु आहेत. दि. 31 जुलै 2021 अखेर सुमारे 12 हजार पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. आपल्या प्रभागामध्ये / क्षेत्रामध्ये पंचनामे करणारे पथक आलेल्या वेळी आपले घर, दुकान बंद असल्याने किंवा आपण उपस्थित नसल्याने किंवा इतर कोणत्याही कारणाने पंचनामे करण्याचे राहून गेले असल्यास खालीलप्रमाणे समन्वय तलाठी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.



नेमून दिलेले ठिकाण सुंदरवाडी नातेखिंड,काकर तळे, महाड नगर परिषद कर्मचारी यांचे नाव व नंबर

श्री. गणेश पाटील, मो.नंबर ९४२३०९२०९३
श्री. गोविंद साळुंखे, मो.नंबर- ७३८७८९०६९२
समन्वयक तलाठी:- श्री. आर.पी. टकले, तलाठी मो.नं. ९८६०८१७७०० सुतारआळी, बुरुडआळी, कॅप्टन बंगला ते पंचशिल नगर संपूर्ण प्रभात कॉलनी, एसबीआय बँक ते आरडीसी बँक सावित्री विग पर्यंत , श्री. संतोष गोविंद पार्ट, मो.नंबर ९०११२४९७७८, श्री.आर.एम.भोसले, तलाठी मो.नं. ८९८३४२९४५१, प्रभात कॉलनी, एसबीआय बँक ते आरडीसी बँक व सावित्री विग पर्यंत, रायगड फोटो स्टुडीओ ते घरवळांचे मोठे किराणा ते विरेश्वर मंदिर, परांजपे हायस्कूल संपूर्ण परिसर डोंगरी गल्ली ते जुनी पेठ संपूर्ण. एम. जी. रोड, श्री. संतोष गोविंद पार्ट, मो.नंबर ९०११२४९७७८,

श्री.एस.जे सोनवणे, तलाठी मो.नं. ९४२३०९२१२०,श्री महादेव पाटील, तलाठी मो.नं. ९०४९६५११७८, क्रांती स्तंभ, भिमनगर, दस्तूरी नाका, सरेकर आळी, गोमुखी आळी काजळपुरा संपूर्ण भाग, खारकांड मोहल्ला, पानसारी मोहल्ला, पूर्ण कोर्ट आळी, गवळ आळी,श्री. दिपक महाडीक, मो.नंबर ८३०८७०२१२२,श्री.अजय महाडीक, तलाठी मो.नं. ९४०४५६१८९८

श्री गणेश मतसागर, तलाठी मो.नं.८२७५०४२३६७,चवदार तळे मधील तळयाच्या मागील बाजूस (विष्णू मंदिर) संपूर्ण परिसर, मंगेश जोशी यांच्या घरापासून संपूर्ण सरेकर आळी परिसर मधली आळी, तांबट आळी, गवळ आळी, रामघाट व भोइघाट परिसर, चुनीलाल मेडिकल ते डोंगरी पूल एम. जी. रोड,जुनी भाजी मंडई ते छञपती शिवाजी मार्ग ते बालाजी मंदिर परिसर, वारंगे दवाखाना ते धारिया बिल्डींग एम. जी. रोड, सुकट गल्ली व कुंभार आळी, वेताळवाडी, तांबडभुवन, वारंगे गॅस ते आय.टी.आय पर्यंत ते भोईघाट पर्यंत, श्री.विजय महाडीक, मो.नंबर ९७६३१९९७३८,श्री.सूरज पुरोहित, तलाठी मो.नं. ९५९५३८५३१९,श्री. यशवंत तळेकर, तलाठी मो.नं. ९२७१८४७८७६



महाडमधील पूरसदृश्य परिस्थिती निवळल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.यासाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील तलाठी, ग्रामसेवक,अव्वल कारकून अशा सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाडमध्ये तात्काळ दाखल होऊन कामाला झपाट्याने सुरुवात केली.



महसूल विभागाच्या अखत्यारीतील पंचनाम्याची कार्यवाही जवळपास पूर्ण होत आलेली असून कृषी विभागानेही पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागानेही आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पूरबाधित क्षेत्रातील मृत जनावरांचे पंचनामे तसेच जीवित सर्व प्रकारच्या जनावरांच्या उपचारासाठी तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे.

महाड ग्रामीण भागातील कोणाचाही पंचनामा शिल्लक असल्यास संबंधित नागरिकांनी आपल्या गावाच्या तलाठ्याशी संपर्क साधावा. तसेच संबंधित तलाठ्याशी नेटवर्क वा अन्य काही कारणामुळे संपर्क न झाल्यास नगर परिषद, महाड (नवी इमारत), शिवाजी चौक, महाड येथील “पंचनामा नियंत्रण कक्षात” दि.4 ऑगस्ट 2021 पर्यंत थेट संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version