दरडग्रस्त गावांमध्ये अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पोलादपूर – संदिप जाबडे: पोलादपूर ते प्रतापगड पर्यंतच्या मार्गावर अंदाजे वीस दरडी कोसळल्या असून त्या हटवण्याच्या काम प्रगतीपथावर आहे. सदरील कामाची पाहणी आज महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली.प्रतापगड परिसरातील नदीपात्रा वरील छोटे-मोठे पुल वाहून गेल्यामुळे 30-35 गावांचा संपर्क तुटलेला आहे.
त्यामुळे सदर गावांना मिळणारी मदत त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात अडथळे येत होते परंतु आमदार भरतशेथ गोगावले यांच्या अथक प्रयत्नाने ती मदत त्यांच्यापर्यंत पोहचल्यामुले तिथल्या ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. सदर ग्रामस्थांनी आमदार गोगावले यांच्याकडे १०० गॅस सिलेंडरची मदत मागितली असता आमदार गोगावले यांनी तात्काळ रायगड जिल्हा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे फोन करून लागणाऱ्या सिलेंडरची मागणी केली. या मागणीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सकारात्मकता दाखवली व लवकरात लवकर आपण त्याची पूर्तता करणार असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार गोगावले यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी वाडा येथील शासकीय विश्राम ग्रह मध्ये वास्तव्यास असलेल्या नुकसानग्रस्त ग्रामस्थांची आस्थेने चौकशी करून आपणास लागेल ते सर्व सहकार्य मी आमदार या नात्याने करीत आहे व भविष्यातही कोणतीही अडचण भासली तरी ताबडतोब कळवा आम्ही आपल्याला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू असे नमूद केले.
तसेच महापुरात संपर्क तुटलेल्या 30 ते 35 गावांकरिता आणखी जीवनावश्यक वस्तूंचे कीट ची व्यवस्था आपण करणार असल्याची घोषणा केली. यावेळी पोलादपूर तालुका प्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, प्रतापगड येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पा उतेकर, संजय जाधव इत्यादी उपस्थित होते.
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group