सध्या वाढत चाललेले इंधनाचे दर, प्रदूषणात झालेली वाढ लक्षात घेता जर्मनीमध्ये आता ई- हायवे तयार करण्यात येत असून या लेनवरून विद्युत तारांचा वापर करून अवजड वाहने चालवली जाणार आहेत.
ज्याप्रमाणे रेल्वे विजेचा वापर करून चालवल्या जातात त्याचप्रमाणे आता जर्मनीमध्ये रस्त्यांवर वाहने धावणार. फ्रॅंकफर्ट शहरानजीक ५ किलोमीटरचा प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रिक हायवे तयार केला असून रोज २० ट्रक मार्गावरून धावत असून त्याद्वारे निरीक्षण नोंदवले जात आहेत.
जर्मनीमध्ये साधारण ४ हजार किमी लांबीचे रस्ते असून जर हा प्रयोग सर्वत्र अवलंबला गेल्यास रस्त्यांलगत विजेचे खांब उभे करावे लागतील. या प्रयोगाद्वारे प्रदूषणात घट होत असल्याने सर्वत्र या प्रयोगाचे स्वागत केले जात आहे.
जर्मनीतील आघाडीची कंपनी सिमेन्सने या प्रयोगासाठी पुढाकार घेतला असून वाहनांमध्ये लागणारी यंत्रणा अतिशय सोपी असणार आहे. दर एक किलोमीटरसाठी अंदाजे २२ कोटी खर्च यासाठी लागणार आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group