पोलादपूर – संदिप जाबडे: पोलादपूर – २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. दुर्गम समजल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यातील केवनाले व साखर सुतारवाडी येथे दरडी कोसळून ११ निष्पाप जीवांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. महापुराने ठिकठिकाणी नद्यांचे पुल वाहून गेल्याने अनेक गावांचे संपर्क तुटले.
संपर्क तुटल्याने वाहतूक व दळणवळण ठप्प झाले व जनजीवन विस्कळीत झाले. अशा कठीण प्रसंगाची जाणीव ठेवत श्री साई एज्युकेशन ट्रस्ट, पुणे व मिशन फॉर व्हिजन फाउंडेशन, पुणे यांच्याकडून पोलादपूर तालुक्यातील आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. याची सुरुवात लोहारमाळ येथील गुरुनानक ढाब्यापासुन करण्यात आली.
गुरुनानक ढाबा येथे झालेल्या स्वागतपर भाषणात संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. रविंद्र सोमोशी सर यांनी संतांचे अनेक दाखले देत या आपत्तीजन्य परिस्थितीचे वर्णन केले. लोहारमाळ, चोळई, सिद्धार्थ नगर, केवनाले, सडवली आदिवासी वाडी या ५ गावांमध्ये गरजूंना १४० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी मिशन फॉर व्हिजन फाउंडेशन, पुणे अध्यक्ष सहदेव गोळे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. रविंद्र सोमोशी सर, उपाध्यक्ष सागर पोटे, सचिव अंबादास बेळसागविकर, खजिनदार तानाजी कसबे, सदस्य बीना राजन, सरिता गोळे, सपना कसबे तर श्री साई एज्युकेशन ट्रस्ट, पुणे चे संस्थापक अध्यक्ष सोपान वांजळे, कार्य अध्यक्ष विजय मराठे, सचिव दत्तात्रय कडू, लक्ष्मण वाशिवले, अनंत सुतार, बाळासाहेब हरपुडे, सदानंद तोंडे, चंद्रकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group