महागाव विभागातील जेष्ठ समाज सेवक,वरदायिनी विद्यालय महागावचे संस्थापक चेअरमन, व्यापारी व परोपकारी व्यक्तीमत्व कै.सुरेशशेट साळवी यांचे दि.१०/९/२०२१ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने महागाव पंचक्रोशीत शोककळा पसरली असून एका परोपकारी व्यक्तीमत्वाला मुकल्याची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महागाव पंचक्रोशीत इयत्ता ७ वी नंतर पुढील शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती.फक्त ऊन्हाळी एस् टी वाहतूक असायची त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात होते शिक्षणाची गरज ओळखून व अडचणींवर मात करीत सन १९८१/८२ साली इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळामार्फत महागाव येथे वरदायिनी विद्यालय महागाव या नावाने हायस्कूल सूरू केले व ते सलग १४ वर्षे विनाअनुदान तत्वावर टिकवून ठेवताना होणारा अतिरिक्त आर्थिक भार सोसत प्रत्येक अडचणीला खंबीरपणे सामोरे जात होते, त्यामुळे या पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थां वेगवेगळ्या उच्च पदावर पोहोचले आहेत.

कित्येकांना प्रापंचिक आडचणीत मदतीचा हात पुढे करून त्याचे संसार वाचविले आहेत. केलेली मदत पुन्हा मिळेल अशी अपेक्षा कधी ठेवलीच नाही.किराणा दुकान सरकार मान्य रास्त भाव साखर व धान्य दुकान, महागाव पोस्टाचे पोस्ट मास्तर म्हणून १५ वर्षे काम केले, आ.भा.सो.क्ष.कासार समाजोन्नती मंडळाचे जिल्हा अध्यक्ष, गणेश विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य,अशी अनेक पदे त्यांनी भुषविली असून विविध उपक्रम राबविले आहेत. कुठेही प्रसिध्दीची हाव नाही, मानसन्मानाची अपेक्षा नाही आगदी निस्वार्थी जिवन ते जगले.

त्यांच्या शैक्षणिक कार्याची जाण ठेवून गेली चाळीस वर्षात वरदायिनी विद्यालय महागाव मधून शिक्षण घेतलेल्या तरुणांनी (माजी विद्यार्थ्यांनी) ८नोहेंबर २०२१ रोजी त्यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून उत्स्फूर्तपणे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते जवळजवळ तयारी पूर्ण झाली होती परंतू अखेरचा सन्मान घेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने खूप हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

इंदापूर विभाग शिक्षण प्रसार मंडळातर्फे दि.१७/९/२१रोजी वरदायिनी विद्यालय महागाव येथे स.१०-३० वाजता घेण्यात आलेल्या शोकसभेला संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत राऊत, सेक्रेटरी अविनाश मांडवकर, सदस्य सुरेश वाघ,नंदकुमार गायकवाड, विठोबा साबळे, लक्ष्मण साळवी तसेच अनेक आजी माजी शिक्षक उपस्थित होते.

त्यावेळी सर्वांनी त्यांच्या स्मृतीस उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला त्यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी या वर्षांपासून एस् एस् सी च्या परिक्षेत पहील्या क्रमांकाने उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला कै.सुरेशमामा साळवी यांच्या नावाने बक्षीस देण्याचे जाहीर केले तसेच सेक्रेटरी अविनाश मांडवकर यांनी श्रध्दांजली वाहताना जाहीर केले की माजी विद्यार्थी संघटनेने नियोजित केलेला दि.८ नोहेंबर २०२१ चा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होईल त्यावेळी वरदायिनी विद्यालयात कै.सुरेश मामा साळवींच्या स्मृती कायम स्मरणात रहातील असे नियोजन करण्यात येईल .


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version