रोहा, सुधागडमध्ये चोरी, जबरी चोरी करणार्या चोरट्याला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गेल्याच महिन्यात जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगून आलेल्या या चोरट्याने, कारागृहातून सुटल्यानंतर या चोर्या केल्याचे समोर आले असून, यापूर्वीही पोयनाड, नागोठणे, पाली, रोह्यामध्ये त्याच्या नावावर 8 गुन्हे दाखल आहेत.
जिल्ह्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत या घटनेचा तपास सुरु करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक संजय डोंबाळे यांचे पथक तयार करण्यात आले होते.
हे पथक चोरट्याचा शोध घेत असताना, कोलाड येथील ज्वेलर्स दुकानात एक इसम सोने विक्री करण्यासाठी गेला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे पथकाने ज्वेलर्स दुकानातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले व त्या इसमाचे फोटो मिळवले. गुप्त बातमीदार तसेच रोहा, कोलाड, पाली व नागोठणे परिसरातील पोलीस पाटील यांना हे फोटो पाठवून शोध सुरु करण्यात आला.
दरम्यान, पोलीस अधीक्षक अशोक दुधे साहेब, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक संजय डोंबाळे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, अमोल हंबीर, प्रशांत दबडे, पोलीस नाईक अक्षय जाधव, सुनिलकुमार खराटे व पोलीस शिपाई अक्षय सावंत यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group