कोरोनाचा हंगाम आणि त्यात चक्रीवादळ, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आधीच कोकणची जनता ग्रासली असून एकप्रकारे एकामागोमाग संकटे चालूच आहेत.
काही दिवसांपासून संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून बराच वेळ लाईट जात आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. काल (९ सप्टेंबर २०२०) असाच माणगांव विभागात मुसळधार पाऊस सुरु झाला आणि वीजासुद्धा जोरात कडकडाट होत असताना अचानक कांदळवाडी येथे गावात वीज कोसळली.
सुदैवाने एखाद्या घरावर न पडता वीज मंदिरावरती कोसळली त्यामुळे गावकऱ्यांच म्हणणं आहे आम्हाला देवानेच वाचवलं. यात मंदिराचा कळस पूर्णतः कोसळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रायगड भागात वीज कोसळणे दुर्मिळच परंतु अशाप्रकारच्या संकटांमुळे माणसांबरोबर मुक्या जनावरांनाही नाहक त्रास किंवा कधीकधी मरणसुद्धा पत्करावे लागते.
जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभाग कायम तत्पर असते परंतु एकामागोमाग एक संकटे रायगडवासियांच्या पदरी पडत असून उपाययोजना आणि मदत वेळेवरती पोहोचणे आवश्यक आहे.