राष्ट्रवादीचे नेते तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे या सध्या राजकारणात स्थिरावल्या आहेत. अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. कोकणातील आलेलं निसर्ग वादळ, तौक्ते वादळ तसेच महाड-चिपळूणमधील पूर अशा प्रत्येक परिस्थितीला स्वतः हजर राहून त्यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. त्यामुळे अभ्यासू आणि धडाकेबाज मंत्री म्हणून आदिती तटकरे यांची चर्चा आहे.

महाड पुराच्यावेळी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून पाहणी करताना अदिती तटकरे


राजकारणात प्रवेश कसा झाला..

ज्या श्रीवर्धन मतदार संघातून अदिती तटकरे निवडून आल्या आहेत तोच मतदार संघ २००८-०९ साली नव्याने बनविण्यात आला होता आणि त्यावेळेस त्यांचे वडील सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी त्यांनी सहभाग घेतला होता.



2011-2012 दरम्यान सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत आदितींनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

23 फेब्रवारी 2017 रोजी रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदा विजयी झाल्या. 21 मार्च 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिलं. 2019मध्ये श्रीवर्धनमधून आमदार म्हणून विजयी झाल्या.



एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते वडिलांची इच्छा असते मुलांनी राजकारणापासून लांब राहावं कारण त्यांनी स्वतः संघर्ष पाहिलेला असतो. पण मी संघटनेत काम करायला सुरुवात केली. एकंदरीत काम करण्याची तळमळ पाहता तेव्हा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनीयर होणार नाही आणि त्यामुळे त्यांनीही मला राजकारणात येण्याची संधी दिली, असं त्या सांगतात.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जानेवारी २०२० मध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली तसेच त्यांना उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क खाती मिळाली असून त्यांच्यावर आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे.

शरद पवार हेच माझे राजकारणातील रोल मॉडल असून त्यांना पाहूनच मी राजकारणात आले, असं त्यांनी सांगितलेलं आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version