केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत मुरूड तालुक्यातील काशीद येथील जेटीचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मुंबई ते काशीद ही रो-रो सेवा डिसेंबर महिन्यात चालू होणार आहे.
रायगड जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला नवे पंख देणारा हा प्रकल्प ठरेल. या प्रकल्पावर ११२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
काशीद समुद्र किनारा लांबलचक असून देश-विदेशातील पर्यटकांना त्याची भुरळ आहे. सुटीचे दिवस आणि आठवडा अखेर तर हा समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराची संधी मिळते. यामुळेच मुंबईतून थेट काशीदपर्यंत जलवाहतूक सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. अखेर त्याला मूर्त स्वरूप आले असून यामुळे अवघ्या दोन तासांत हा किनारा गाठणे शक्य होणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने काशीद येथे जेटी बांधण्याचे काम हाती घेतले आहे.
केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत हा प्रकल्प असणार आहे. पार्किंग व्यवस्था, टर्मिनल इमारत अशी कामेही या ठिकाणी करण्यात येत आहेत. त्यामध्ये तिकीट सुविधा, प्रवाशांसाठी आसन व्यवस्था, स्वच्छतागृह, जोड रस्ता, पाणी अशा अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे वेळेबरोबरच इंधनाची बचत होऊन पर्यटन वाढीला अधिक चालना मिळणार आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ११२ कोटींच्या या प्रकल्पाचे आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले असून ते डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group