उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )श्री साईबाबा उत्सव समिती, रिटघर तर्फे रायगड भूषण भारत भोपी (मा.सरपंच) परिवारातर्फे श्री. सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साईबाबांचा अभिषेक, पुजा, चक्रीभजन, भजन, दिंडी सोहळ्याचे आयॊजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी आमदार बाळाराम पाटील, सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सुभाषशेठ भोपी, साई संस्थान वहाळचे रवीशेठ पाटील, क्रांतिकारी सेवा संघाचे नामदेवशेठ फडके आदी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल श्री साई सन्मान पुरस्कार-2022 प्रदान करण्यात आले.



यामध्ये संगीताताई ढेरे (सामाजिक),हनुमान म्हात्रे (सैनिक),सुनिल वर्तक (सामाजिक),कौशिक ठाकूर (शैक्षणिक),अनिल घरत (सामाजिक),प्रमिला ढोल (कायदेतज्ञ),रमेश जाधव (वनपाल), मयूर तांबडे (पत्रकार )आदींना साई सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



यावेळी उद्योजक जे.एम.म्हात्रे, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रितम दादा म्हात्रे, जि.प. सदस्य विलास फडके, राजेश केणी, रायगड भूषण राजू मुंबईकर, राणी मुंबईकर, रायगड भूषण भारत भोपी, बबन विश्वकर्मा, नवनीत पाटील, माधव म्हात्रे , देवेंद्र पाटील, अल्लौद्दीन शेख, नितिन जोशी, पत्रकार सय्यद अकबर, गणपत वारगडा, रवींद्र पाटिल, महादेव गायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आई निवास साईबाबा उत्सव समिती आणि भोपी परिवार यांच्या बरोबरच राजू मुंबईकर यांनी विशेष मेहनत घेतली.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version