विमानांची वाहतूक आणि जाळं इतकं पसरलंय कि लँडिंग करायला पण वेटिंग असते. आपलं मुंबईचेच उदाहरण घ्या. ९ डिसेंबर २०१८ रोजी एकूण १००७ विमानांची वाहतूक एका दिवशी होऊन वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता आणि इतक भार सहन होत नाही म्हणून पनवेलनजीक नवी मुंबई येथे दुसरे विमानतळ होत आहे. परंतु हजारो प्रवासी विमाने देशात आणि परदेशात ये-जा करीत असली तरी हिमालय पर्वत रांगेवरून प्रवासी विमान जात नाही.
जाणून घेऊया महत्वाची कारणे:
हिमालय पर्वतांची उंची: हिमालय पर्वतांची उंची २०,००० फुटांपेक्षा जास्त आहे आणि प्रवासी विमाने साधारण ३०,००० फुटांपर्यंत उडत असतात. तसेच हिमालयातील एव्हरेस्ट पर्वताची उंची तब्बल २९,०३५ फूट इतकी आहे त्यामुळे सुरक्षित अंतराच्या कारणामुळे विमाने जात नाहीत. तसेच…
Emergency Landing: चुकून काही विमानात किंवा हवामानात बिघाड झाला तर emergency लँडिंगचा प्रश्न उद्भवतो. सपाट जागेचा अभाव असल्यामुळे त्वरित लँडिंग करणे अवघड आहे.
सीमावाद: भारताशी पाकिस्तान आणि चीनचे सीमावाद आणि दहशतवादाचे प्रकार घडत असल्यामुळे तिथून विमाने नेणे धोकादायक मानले जाते.
ऑक्सिजनची कमतरता: सतत होणारे हवामानातील बदल आणि पर्वतरांगेतील बर्फाळ प्रदेश यांमुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवून प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता असते.
रडार व्यवस्था: Navigation Radar Service खूप दुर्मिळ असून क्वचित सापडत असल्याने पायलटचा जमिनीवर संपर्क होण्यास अडचण होते तसेच काही दुर्घटना किंवा बिघाड घडल्यास तात्काळ मदतीसाठी अडचण होऊ शकते.
लष्करी कारवाया: मुळात सीमावाद आणि दहशतवादामुळे हा भाग कायमच काहीना काही घडामोडींमुळे चर्चेत असतो त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी कायम लष्करी कारवाई किंवा ऑपरेशन्स होत असतात. तसेच सैनिकांना मदत व रसद पुरविण्यासाठी या भागातून एअरफोर्स विमाने व हेलिकॉप्टर्स कायम ये-जा करत असतात त्याही कारणामुळे हिमालयावरुन प्रवासी विमाने जात नाहीत.