उरण दि 19(विठ्ठल ममताबादे)- हिंदू धर्मात गाय,गायत्री आणि गंगा ह्या तीन गोष्टीनां अनन्यसाधारण महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार गायीला फार फार महत्व दिले गेले आहे. वास्तूशास्त्रानुसार वास्तुदोष असणाऱ्या एखाद्या घरात गायीच्या नुसत्या असण्याने त्या घरातील वास्तूदोषांचा नाश होतं तर धर्मशास्त्रानुसार तिच्या पूजनाचे सर्व देवांच्या पूजनाचे फळ प्राप्त होत म्हणून गायीला फक्त पशु म्हणून न पाहता हिंदू धर्मात गायीला आईचं (गोमाता) स्वरूप मानलं जाते.पूजलं जाते.सोबतच आपल्या जीवनात आपण केलेल् दान सुद्धा एक सत्कार्याचे रूप आणि दैवी गुण आहे असं मानलं जाते.
आपल्या जवळ जे काही आहे ते निस्वार्थीपणे दुसऱ्याला देणं म्हणजे दान करणे होयं.आणि आज पर्यंत अनेक सत्कार्याच्या माध्यमातून दिन-दुबळ्यां गरीब-गरजूवंतानां मदतरुपी दानधर्म करणारं व्यक्तिमत्व राजू मुंबईकर यांनी आज एक पुण्यकर्माचं कार्य केलं ते म्हणजे श्री स्वामी परमानंदाश्रम ट्रस्ट मु.दादर,( परमानंद वाडी ) ता.पेण,जि.रायगड यांच्या समाधी मठावरील आश्रमात एक गिर जातीच्या गोमातेला गायदान स्वरूपात समाधी मठावर अर्पण करण्यात आले..
दान- धर्म आणि पूजा-कर्म केल्याने मनुष्याला जीवनात पुण्यकर्माचं भाग्य लाभतं.आणि आज हेच गायदानरुपी पुण्यकर्म करून राजू मुंबईकर यांनी सत्कार्य केले आहे.श्रीमत् परमहंस श्री समर्थ स्वामी परमानंद महाराज समाधी मठावर सत्संगासोबत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नेहमी होत असते.त्याच सोबत तिथे होम-हवन विधी पार पडत असतात.अश्या धार्मिक पूजा-अर्चाच्यां प्रारंभी वास्तूशुद्धी करिता गोमूत्र आणि गायीच्या शेणाचा प्रमुख्याने उपयोग केला जातो. आणि त्याच महत्व देखील खूप आहे .गोमूत्रात पोटॅशियम, कॅल्शियम,मॅग्नेशियम,कार्बोलिक ऍसिड ,सोडियम या सारखी अनेक खनिजद्रव्य असतात त्यामुळे शरीरातील बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन देखील नाहीसे होतात.
सोबतच वातावरणातील बॅक्टेरिया देखील नष्ट होतात त्याच्यातच गिर जातीच्या गायीच्या गोमूत्राचं महत्व हे विज्ञानाने देखील मान्य केलं आहे.गायीच्या शेणाला देखील धर्मशास्त्रात खूप महत्व दिले गेलं आहे.याच वैज्ञानिकदृष्टया आणि धार्मिक दृष्ट्या महत्व असलेल्या ह्या गिर जातीच्या गायदानाला देखील खूप महत्व प्राप्त झाले आहे. राजू मुंबईकर आणि राणिताई मुंबईकर यांच्या सोबत त्यांचे पिताश्री बळीराम मुंबईकर आणि राजू मुंबईकर यांच्या दोन सुकन्या वैष्णवी मुंबईकर ,सृष्टी मुंबईकर, प्रतीक्षा म्हात्रे या परिवाराने गोमातेच यथासांग पूजन करून पुरोहिताच्या हस्ते,महाआरती,पूजाअर्चा करून परमानंद स्वामींच्या चरणी गोमातेच दान केले.आणि स्वामींच्या मठावरील सेवेकरी महाराज मंडळींनां गोड-धोंड मिठाईचं वाटप करून आपल्या परिवारासोबत मठावरील सर्व मंडळींच्या सोबतीनं भोजन पंगती वाढून अन्नदानाचं पवित्र कार्य सुद्धा केले. आणि लवकरच येथे एका सुंदर प्रशस्थ अश्या गोशाळेचं सुद्धा पूजन आणि बांधकाम केलं जाईल अशी ग्वाही येथील सेवेकरी महाराज मंडळी आणि सर्व ट्रस्टी मंडळींना राजू मुंबईकरांनी दिली.
ह्या गायदाना सारख्या पवित्र धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी राजू मुंबईकर यांच्या परिवारा सोबत श्री स्वामी परमानंद महाराज समाधी मठावर अनिल घरत, संपेश पाटील, क्रांती म्हात्रे,अरविंद पाटील उपस्थित होते. मठावरील सर्व सेवेकरी महाराज मंडळींच्या उपस्थितीत हा गायदानाचा पवित्र सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group