कोरोना काळात आघाडी सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. दोन वर्षात या मंत्र्यांनी उपचार घेतल्याची बिलं राज्य सरकारला सादर केली आहे. या सर्व मंत्र्यांच्या उपचारापोटी शासनाने तब्बल 1 कोटी 39 लाख 26 हजार 720 रुपये भरले आहेत. सरकारी नियमानुसारच हे बील भरण्यात आलेलं आहे.



परंतु, ज्यावेळी जनता सरकारी रुग्णालयात उपचार घेत होती, तेव्हा मंत्री मात्र फाईव्ह स्टार हॉटेलात उपचार घेत होते. त्यामुळे मंत्र्यांचा सरकारी रुग्णालयांवर विश्वास नाहीये का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे.



राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही खासगी रुग्णालयात उपचार घेतले असल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे. राजेश टोपे यांनी या दोन वर्षात 34 लाख 40 हजार 930 रुपये बिलांची पूर्तता केली आहे. त्यांनी दोन वर्षात बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. त्यामुळे टोपेंचा सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही असा सवालजनतेकडून केला जात आहे.



हॉस्पिटलमध्ये मंजूर झालेली बिले:
केईएम हॉस्पिटल 1 लाख 5,886
आधार हॉस्पिटल 88 हजार 466
अवंती हॉस्पिटल 7 लाख 56,369
बॉम्बे हॉस्पिटल 41 लाख 38,223
अनिदीप हॉस्पिटल 1 लाख 80 हजार
ग्लोबल हॉस्पिटल 4 लाख 65,874
जसलोक हॉस्पिटल 14 लाख 55,96
फोर्टिस हॉस्पिटल 11 लाख 76,278
लिलावती हॉस्पिटल 26 लाख 27,948
ब्रीच कँण्डी हॉस्पिटल 15 लाख 37,922

खाजगी रुग्णालयात सरकारी खर्चातून उपचार घेणारे मंत्री:
राजेश टोपे, 34 लाख 40 हजार 930
हसन मुश्रीफ 14 लाख 56 हजार 604
जयंत पाटील, 7 लाख 30 हजार 513
अनिल परब, 6 लाख 79 हजार 606
अब्दुल सत्तार, 12 लाख 56 हजार 748
सुनील केदार, 8 लाख 71 हजार 890
जितेंद्र आव्हाड, 11 लाख 76 हजार 278
सुभाष देसाई, 6 लाख 97 हजार 293
छगन भुजबळ, 9 लाख 3 हजार 401
डॉ. नितीन राऊत, 17 लाख 630 हजार 879

सरकारी निधीतून उपचार घेणारे मंत्री:
विजय वडेट्टीवार, 2 लाख 4 हजार 45
सुनिल केदार, 1 लाख 15 हजार 521
नवाब मलिक, 26 हजार 520
अशोक चव्हाण, 2 लाख 28 हजार 184
दत्तात्रेय भरणे, 1 लाख 5 हजार 886
प्राजक्त तनपुरे, 38 हजार 998
के. सी. पाडवी, 1 लाख 25 हजार 284
संजय बनसोडे, 2 लाख 20 हजार 661


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version