उरण दि 4(विठ्ठल ममताबादे)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सर्वत्र हनुमान चालीसा वाचण्याचे आदेश दिले होते व अनधिकृत भोंगा विषयी आवाज उठवा असा आदेश औरंगाबादच्या सभेत दिला होता. 4 मे पासून कोणतेही परिस्थिती उदभवेल असा इशारा राज ठाकरे यांनी भर सभेत दिला होता.



त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त केला आहे. उरण तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. समाजात शांतता प्रस्थापित राहावी या दृष्टीकोणातून उरण पोलीस ठाण्यातर्फे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.



दिनांक 04/05/2022 रोजी उरण पोलीस ठाणे हद्दीतील

1) संदेश बालचंद्र ठाकूर, वय-50 वर्ष, रा- नयन अपार्टमेंट C विंग, रूम न. 4, पहिला मजला उरण , जि. रायगड.
पद – रायगड जिल्हा अध्यक्ष मनसे

2) अल्पेश अशोक कडू, वय-39 वर्ष, रा.सोनारी, ता.उरण, जि.रायगड
पद – महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मनसे वाहतूक सेना

3) मंगेश जनार्दन वाजेकर, वय-49 वर्ष, धंदा-व्यवसाय, रा. जसखार, ता. उरण, जि. रायगड,
पद – उरण तालुका उपाध्यक्ष मनसे

4)सतीश बिपीन पाटील, वय-33वर्ष, रा-नागाव घोसपाडा रामचंद्र अपार्टमेंट, दुसरा मजला रूम नंबर-201, उरण, ता.उरण, जि. रायगड.
पद – उरण तालुका संघटक मनसे

5) रितेश विष्णू पाटील, वय -44, रा. बोकडविरा, मराठी शाळेचे पाठीमागे, उरण, ता- उरण, जि. रायगड.
पद – रायगड उप-जिल्हा संघटक मनसे



असे मनसे पदाधिकारी/कार्यकर्ते यांना 11.05 वा. चे दरम्यान मनसे कार्यालय वाणीआळी, उरण, ता.उरण, जि.रायगड या ठिकाणाहून ताब्यात घेऊन सी.आर.पी.सी. 151 (1) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.अशी माहिती सुनिल पाटील – वरिष्ठ पोलीस निरिक्षक उरण पोलीस ठाणे, नवी मुंबई यांनी दिली आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version