उरण दि ९(विठ्ठल ममताबादे)- मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर रविवार दिनांक १५-०५-२०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत उरण नगरपरिषद शाळा , पेन्शनस पार्क , एनएमएमटी बस स्टँड च्या समोर उरण शहर येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर आरोग्य शिबिरात जनरल तपासणी , दंत तपासणी,डोळे तपासणी ,रक्तदाब तपासणी,हाडांचे आजार तपासणी,मधुमेह रक्त तपासणी,स्त्रीरोग तपासणी , ई . सी. जी आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.तसेच ठराविक चष्म्यावर ५०% सवलत देण्यात येणार आहे.
गरजूंनी, रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा,सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण , MGM हॉस्पिटल वाशी नवी मुंबई,आर्ट ऑफ लिव्हिंग उरण,त्रिलोचन आय केअर क्लिनिक उरण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group