उरण दि 23(विठ्ठल ममताबादे)- सर्वत्र शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु असून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत- गाव तिथे शाखा-घर तिथे शिवसैनिक या माध्यमातून उरणमध्ये नवीन शाखाप्रमुख यांच्या नियुक्या रविवार दिनाकं 22 मे 2022 रोजी शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात जाहीर करण्यात आल्या.



शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख ठाण्याचे खासदार राजन विचारे , जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सर्वाना नियुक्ती पत्र दिले. या मध्ये भेंडखळ शाखाप्रमुखपदी रमेश पाटील, आनंदनगर शाखाप्रमुखपदी मणीराम पाटील, भवरा बाध शाखाप्रमुख पदी रेहान असफाक मुन्शी व उपशाखाप्रमुख पदी असिफ अब्दुलसत्तार भालके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



नियुक्ती प्रदान करते वेळी माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश राहळकर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी एन डाकी, गटनेते गणेश शिंदे, जि प सदस्य विजय भोईर, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे व पदाधिकारी उपस्थित होते.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version