उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )- मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथील सिडकोच्या माध्यमातून नव्याने साकारण्यात येत असलेल्या नवघर रेल्वे स्टेशन काम जवळपास पुर्ण होत आले असून सातत्याने सिडको सोबत पत्रव्यवहार करून तसेच भेटीगाठी घेऊन देखील पर्यायी रस्त्याची दखल घेताना दिसत नाही या अगोदर दि.३१/०१/२०२० रोजी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी पुजारी यांच्या दालनात नवघर ग्रामस्थांन सोबत झालेल्या बैठकीत दिलेली पर्यायी रस्त्याची लेखी हमी म्हणून पुन्हा सिडकोला आठवण देण्यासाठी दिनांक २५/०५/२०२२ रोजी सि.बी.डी.सिडको आ‌ॅफीस कोकण भवन येथे जाऊन निवेदन दिले.



त्याप्रमाणे सिडकोचे अधिकारी कांकरिया यांनी दि.२६/०५/२०२२ रोजी येऊन प्रत्यक्ष नवघर रेल्वे स्टेशनचे जेथे काम चालू आहे तेथे येऊन पाहणी केली असता येथील ग्रामस्तांची मागणी योग्य आहे मी तसा योग्यतो रिपोर्ट सिडको आणि रेल्वेला देतो असे सांगितले. यावेळी सुरेश तांडेल,रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर,उपसरपंच रवीशेठ वाजेकर,ग्रामस्थ मंडळ नवघरचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील,शिवसेना शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे,मोतीराम डाके उपस्थित होते.



परंतू सातत्याने निवेदने,बैठका घेऊन देखील तसेच पावसाळा जवळ आला असता तोंडी आश्वासना पलीकडे कोणताही लेखी ठोस निर्णय देत नाहीत आणि प्रत्यक्ष सदर रस्ता रहदारी साठी मोकळा करत नाहीत म्हणून पुन्हा एक संधी म्हणून दिनांक ५/०६/२०२२ पर्यंत जर निश्चित लेखी उत्तर सिडको तसेच रेल्वेच्या सक्षम अधिका-यां कडून दिला नाही आणि सदर रस्ता मोकळा केला नाहीत तर ५/०६/२०२२ नंतर नवघर रेल्वे फाटका जवळ म्हणजे ६ जून २०२२ रोजी धरणे धरण्याचा निर्धार नवघर ग्रामस्थांनी केला आहे.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version