उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )- सध्या इतर मागासवर्गीय (ओबीसी )आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा देशभर चर्चीला जात आहे.ओबीसी समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने व ओबीसी समाजाच्या विविध समस्या मागण्या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तसेच विविध विषयावर विचार मंथन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 12 जून 2022 रोजी सकाळी 9 ते सायं 7:30 या वेळेत रामशेठ ठाकूर कॉम्प्लेक्स, शेलघर, उलवे नोड येथे करण्यात आले होते . या शिबिरासाठी काँग्रेस पक्षाचे मंत्री महोदय उपस्थित होते. यावेळी मंथन शिबिरात विविध जेष्ठ नेते, ओबीसी नेते यांनी विविध विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.



या मंथन शिबिराला उदघाटक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव, अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तारीक अन्वर, राष्ट्रीय को ओरडीनेटर के राजू, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक कल्याण क्रीडा मंत्री सुनिलजी केदार, मंत्री विजयजी वडेट्टीवर आदी मंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे व ओबीसी सेलचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले. आपल्या प्रास्तविकात त्यांनी कोकण विभागात ओबीसी समाजाची संख्या जास्त आहे. येथे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगत कोकण विभागातच शिबीर का घेतले जात आहे या पाठीमागची भूमिका स्पष्ट केली.



महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शासकीय समित्या व महा मंडळावर ओबीसीना प्रतिनिधित्व देण्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील साधू संतांची उदाहरणे देऊन सर्वांना समतेचा विचार सोबत घेऊन वाटचाल करण्याचे आवाहन सर्वांना केले.तसेच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.तर काँग्रेस एक विचारधारा या विषयावर युवक व क्रीडा कल्याण मंत्री सुनिलजी केदार यांनी आपला संघर्षमय जीवन सर्वासमोर मांडला. पक्ष ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असल्याचे सांगत पक्ष गोर गरीब, ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत आहे याची माहिती दिली. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरक्षण बाबत राज्य व केंद्र सरकार मधील समन्वय व केंद्र राज्य स्तरावरील योजना व प्रभावी अंमलबजावणी याबाबत माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे ओबीसी समाजाला देण्यात येणारे सेवा सवलती बाबत सविस्तर माहिती दिली.ओबीसी समाजाला सर्वप्रथम शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. महाज्योती सारख्या स्वायत्त संस्था द्वारे विद्यार्थ्यांना विविध शिक्षण प्रशिक्षण मोफत देऊन त्यांना स्वावलंबी करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तारीक अन्वर यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाजपचे, आर एस एस चे कोणतेही योगदान नसल्याचे सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष नेहमी सर्वसामान्य सोबत असल्याचे सांगितले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय को ऑरडीनेटर के राजू ओबीसी साठी काँग्रेस पक्षानेच सर्वात जास्त काम केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन काँग्रेसचे विचार तळागाळात पोहोचविले पाहिजे. ओबीसी समाजाला काँग्रेस पक्षच न्याय देऊ शकतो असे सांगत त्यांनी राजस्थान उदयपूर येथील 15 मे 2022 रोजी संपन्न झालेल्या चिंतन शिबिरातील घेतलेले महत्वाचे निर्णय समजावून सांगितले.अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ओबीसीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध विकास योजना सुरु असून ओबीसी समाजाला सर्वतोपरी न्याय देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ओबीसी समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आतिष पाटील यांनी केले.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version