गेल्या २४ तासाहून अधिक काळ महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र होत चालला आपल्याला पाहायला मिळत आहे. नाराज आमदारांसह भाजपची सत्ता असलेल्या आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता त्यांची भूमिका आणखी स्पष्ट केली आहे. आपण दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्याच बरोबर सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. पण त्याच बरोबर शिंदे यांनी थेट पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे.



एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेने गटनेतेपदावरून घेतलेला निर्णय अवैध असल्याचे म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी काल सोमवारी सूरत गाठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुपारी बोलवलेल्या बैठकीत शिंदे यांना गटनेतेपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिंदेच्या जागी तडकाफडकी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. या निर्णयावर बोलताना शिंदे म्हणाले, गटनेतेपदाची झालेली निवड ही अवैध पद्धतीने झाली आहे. सर्व आमदारांना बोलवून बहुमताने गटनेता निवडला जातो. पण बहुमताचा आकडा आमच्या बाजूने आहे. आमच्याकडे ४५ पेक्षा आमदारांची संख्या आहे, त्यामुळे काल निवडण्यात आलेला गटनेता हा कायदेशी नाही असे शिंदे म्हणाले.



मी कोणाच्या विरोधात बोललो नाही अथवा अशी कोणतीही गोष्ट केली नाही जी चुकीची आहे. तरी देखील मला गटनेतेपदावरून काढले, तसेच माझे पुतळेसुद्धा जाळले, माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत आणि मला बदनाम केले जात आहे, हे योग्य नसल्याचे शिंदे म्हणाले.



शिवसेनेच्या आमदारांना मारहाण करण्यात आली आणि त्याचे अपहरण करण्यात आले असा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार माझ्यासोबत स्वखुशीने स्वतःच्या मर्जीने आले आहेत. आमदारांची नाराजी याआधी देखील मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली असल्याचे ते म्हणाले.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version