उरण दि 26(विठ्ठल ममताबादे)- मनसे पक्ष प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवा नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी तळोजा मनसे कार्यालय पनवेल गड येथे विविध क्षेत्रातील पक्षातील तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. व पक्ष प्रवेश केला.तसेच संघटनात्मक मजबुती करण्याकरता असंख्य विभागातील विभाग अध्यक्ष व उपविभाग अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश भाई ठाकूर, उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश व पद नियुक्त्यांचा कार्यक्रम पार पडला.



पनवेल तालुक्यामध्ये अतिशय उत्साहात आणि नवचैतन्य वातावरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावात वाढतच आहे आणि यापुढे देखील हजारो महिला भगिनींची पक्षप्रवेश प्रलंबित असून लवकरच होणाऱ्या पुढील जाहीर मेळाव्यामध्ये प्रवेश घेवुन संपूर्ण पनवेल तालुका हा मनसेमय करणार असा निर्धार पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी व्यक्त केला.



जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रामदास पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व नविन पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. मनसे जिल्हाध्यक्ष रामदास पाटिल यांच्या नेतृत्वात भूमिपुत्रांचे आंदोलने उभारून पक्षाची ताकद वाढवू असा निर्धार यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version