उरण दि. 27 (विठ्ठल ममताबादे )- दातांच्या आरोग्याचे तज्ञ,रूट कॅनल स्पेशालिस्ट व ईम्प्लान्टोलॉजिस्ट डॉ. शुद्धोधन गायकवाड यांचे नवी मुंबई मध्ये विविध ठीकाणी ब्रँचेस असून उरण मधील ग्रामीण भागातील गोर गरिब जनतेला आहे त्याच ठिकाणी अत्याधूनिक व उत्तम सुविधा मिळाव्यात तसेच दाताच्या रोगासाठी वाशी, पनवेलला अनेक नागरिक जात होते त्यामुळे त्यांचा त्रास, पैसा वेळ श्रम याची बचत व्हावी या दृष्टीकोणातून डॉ गायकवाड यांनी उरण तालुक्यामध्ये कोप्रोली चौक, कोप्रोली येथे प्रथमच अत्याधुनिक डेंटल क्लिनिक सुरू केले. त्याचे उद्‌घाटन दि 26/6/2022 रोजी करण्यात आले.



डॉ शुद्धोधन गायकवाड, डॉ मृणाली डुबल, डॉ राधिका धलवार,डॉ आकांक्षा भोळे, डेंटल असिस्टंट जागृती वशेणिकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप उदूगडे, महाराष्ट्र राज्य भाजपाचे सरचिटणीस अश्विन आगमनकर, भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष विकी पाटील,भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे उरण तालुकाध्यक्ष सुदेश पाटील, भाजपा गाव अध्यक्ष अभय पाटील, प्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक आदी विविध मान्यवरांनी क्लिनिकला भेट देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



चंद्रशेखर राघो पाटील कॉम्प्लेक्स,कोप्रोली चौक, कोप्रोली येथे पहिल्या मजल्यावर असलेल्या डॉ. गायकवाड डेंटल क्लिनिकला यांनी भेट देउन शुभेच्छा दिल्या. उरण मध्ये कोप्रोली येथे डॉ. गायकवाड यांचे डेंटल क्लिनिक सुरू झाल्याने नागरिकांना आता वाशी, पनवेलला जावे लागणार नाही.



उरण मध्येच उत्तमोत्तम सुविधा मिळणार असल्याने नागरिकांची पैशाची, वेळेची, श्रमाची बचत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या क्लिनिकला एकदा तरी अवश्य भेट दयावे असे नागरिकांना आवाहन करत महाराष्ट्र भाजपा सरचिटणीस अश्विन आचमनकर यांनी या क्लिनिकला, क्लिनिकच्या अधिकारी कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version