उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे)- जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल व केअर ऑफ नेचर सामाजिक संख्या वेश्वी- उरण यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित केलेल्या उरण तालुक्यातील वेश्वी येथे विविध विकास कामांचे उदघाटन पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते झाले.प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून पूजन करण्यात आले.तदनंतर पाहुण्यांचा सरकार समारंभ पार पडला.त्यानंतर वेश्वि व जांभूळपाडा गावातील लोकांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.



यावेळी पाहुण्यांचे मनोगत झाले.युवा नेते प्रीतम मुंबईकर, महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, महेंद्र मुंबईकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.आम्हीं वेश्विकर नावाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.स्वर्गीय गंगाबाई पदाजी मुंबईकर यांच्या नावाने गणेश घाटाचे लोकार्पण,रॉक अनिमल पार्कचे लोकार्पण,वृक्षारोपण आदी विविध विकासकामांचे उदघाटन युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी केले.



यावेळी माजी सरपंच नामदेवशेठ पाटील वेश्वी ,माजी सरपंच शामशेठ मुंबईकर वेश्वी ,माजी सरपंच एकनाथ माळी दिघोडे,सरपंच संदीप कातकरी वेश्वी ,रामनाथ चांगु पाटील समाजसेवक,महेंद्र मुंबईकर सेक्रेटरी रायगड कॉंग्रेस, शांताराम बुवा पाटील,चंद्रकांत मुंबईकर चेअरमन इंग्लिश स्कूल वेश्वि,अमृत जोमा पाटील समाजसेवक, रमेशजी मुंबईकर,विजय मुंबईकर,मधुकर मुंबईकर,महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर संस्थापक कॉन संस्था,स्नेहल पालकर अध्यक्ष कॉन संस्था,संदेश घरत उपाध्यक्ष कॉन संस्था,संपेश पाटील अध्यक्ष मित्र परिवार,




सुरेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ता पाले,क्रांती म्हात्रे,अजिंक्य पाटील,माधव म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते,सुनिल वर्तक प्रसिद्ध निवेदक,आदिवासी बांधव जांभूळ पाडा, कातकरीवाडी वेश्वि वाडीतील आदिवासी बांधव व वेश्वि गावातील गावकरी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे निवेदन जयदास ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन कॉन(केअर ऑफ नेचर )या संस्थेचे उपाध्यक्ष संदेश घरत यांनी केले.वेश्वी गावात विविध विकासकामांचे उदघाटन झाल्याने वेश्वी गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version