आपल्या अभिनयानं नाट्य आणि अनेक वर्षे मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांची मोरूची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं.



त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्यांच्या मृत्यू मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.



प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात स्थायिक होते. महाविद्यालयापासूनच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय साकारण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी व्यवसायिक नाटक करायला सुरुवात केली.



मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका फार गाजली. त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ अशा चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version