उरण दि १८(विठ्ठल ममताबादे)- ७५ वा स्वातंत्राचा अमृत महोत्सव रोटरी इंग्लिश हायस्कूल ज्यू .कॉलेज ऑफ सायंन्स व कॉमर्स बोरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे अध्यक्ष शेखर द्वारकानाथ म्हात्रे यांच्या हस्ते सकाळी ०८.०० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. ७५ वा स्वातंत्राचा अमृत महोत्सवा निमित्त स्वातंत्र सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड, चंद्रकांत म्हात्रे , आणि स्वर्गीय जयंतीलाल मेहता यांच्या पत्नी श्रीमती. प्रज्ञा मेहता यांचे शेखर द्वारकानाथ म्हात्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आले.



अली मुकरी माजी नगरसेवक कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांचे ७५ वा वाढदिवसा निमित्त त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे देशभक्ती या विषयावर शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष शेखर द्वारकानाथ म्हात्रे यांनी ७५ वा स्वातंत्र अमृत महोत्सवा निमित्त भाषण केले व उपस्थित मान्यवरांना, पालकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच उरण चे प्रसिद्ध डॉ. ए. बी. दहिफळे यांनी डॉक्टरकीच्या माध्यमातुन केलेल्या समाजसेवे बद्दल भाषणात त्यांचा उल्लेख केला. या प्रसंगी संस्थेचे यतीन म्हात्रे (उपाध्यक्ष), विकास महाजन (सेक्रेटरी), नरेंद्र पडते (विश्वस्त), डॉ.बी.व्ही.देवणीकर (विश्वस्त),जगदिश पाटील (विश्वस्त),राज शेखर म्हात्रे (सदस्य), प्रलोभ पाणिकर (सदस्य) कार्यक्रमास उपस्थित होते.



शाळेच्या प्रशासकीय अधिकारी, प्रिंसिपल, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला.अशा प्रकारे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version