उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे)- प्रविण दत्तात्रेय देशपांडे वय 46 वर्ष राहणार सिद्धिविनायक सोसायटी बी विंग बी 7, मुंबई हायवे पळस्पे तालुका- पनवेल. रायगड 410206, मोबाइल नंबर 8451081948 हा इसम लोकांना नवीन चार चाकी व दू चाकी गाडी मिळवून देण्याच्या अपेक्षेने करोडो रुपयाना गंडविले आहे. प्रविण दत्तात्रेय देशपांडे या व्यक्तीचा संपर्क पनवेल येथील प्रसिद्ध दुचाकी विक्रेते देत असल्यामुळे लोकांना प्रथम फसवणूक होणार नाही याची खात्री होते.
तसेच पैसे दिल्यावर हा व्यक्ति त्याच्या युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा पनवेल जिल्हा रायगड खाते नंबर 34480201087767, IFSC CODE – UBIN0534480 खात्याचा चेक देतो. त्यामुळे खरेदीदाराला शंका येत नाही .गाडी न दिल्यामुळे चेक बँकेत टाकल्यावर चेक बाऊन्स होतो व त्यानंतर ग्राहकाला आपली फसवणूक झाली हे लक्षात येते.
प्रविण दत्तात्रेय देशपांडे याने खोटे आधारकार्ड काढून पॅनकार्ड द्वारे युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा पनवेल जिल्हा रायगड येथे खोटे बनावट अकाऊंट काढले आहे. चेक बाऊन्स साठी कोर्ट मार्फत असलेली मोठी प्रक्रिया आणि वेळ जात असल्यामुळे अनेक लोकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.असाच अनुभव उरण मधील रहिवाशी सतीश म्हात्रे, अमित ठाकूर, संतोष पाटील यांना आला आहे.
नवीन गाडी देण्याच्या बहाण्याने प्रवीण देशपांडे यांनी सदर नागरिकांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.तिन्ही व्यक्तीचे एकूण 10 लाखाची फसवणूक झालेली आहे.याबत उरण पोलिस ठाणे येथे प्रवीण देशपांडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवीन गाडी देण्याच्या बहाण्याने 25 ते 30 लोकांची 2 ते 3 करोडची फसवणूक प्रवीण देशपांडे यांनी केल्याची माहिती फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी दिली आहे.
Cannot collect videos from this channel. Please make sure this is a valid channel ID.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
