उरण दि 20(विठ्ठल ममताबादे)- कै. श्री. रा.ग गावंड कला, क्रीडा, सामाजिक संस्था आवरे मार्फत कै. निर्मला नामदेव गावंड यांच्या स्मरणार्थ पितृ पाखातील सन्मानाचा दिवस म्हणजे अविधवा नवमी वार सोमवार दिनांक 19/09/ 2022 रोजी आवरे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडापे आवरे – उरण या शाळेतील पहिली ते चौथीच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना चालू वर्षी कै.श्री.रा. ग. गावंड कला क्रीडा व सामाजिक संस्था आवरे संस्थेचे अध्यक्ष नितीन रामदास गावंड यांच्या मार्फत प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले.



रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडापे आवरे या शाळेचे मुख्याध्यापक हितेंद्र म्हात्रे व शिक्षक रमेश पाटील यांच्या मागणी व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे व खाऊचे वाटप करण्यात आले.या गणवेशांचे वाटप करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व पूर्ण गावंड कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.



संस्थेचे अध्यक्ष नितीन गावंड यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व सांगितले की शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये नक्कीच सुधारणा करू तुमची शैक्षणिक प्रगती वाढावी हीच आमची अपेक्षा. या कर्मभूमीतूनच आमच्या कुटुंबाची बाबांच्या श्रमातून सुरुवात झाली कुटुंब आणि समाजातील गोरगरिबांना मदत केली आणि त्याच संस्कारांचा वसा काही प्रमाणात आम्ही सुरू ठेवला आहे असे मत संस्थेच्या अध्यक्षांनी व्यक्त केले. तसेच डॉक्टर संदेश गावंड यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना आरोग्याबद्दल माहिती दिली.



साईनाथ गावंड यांनी आपल्या मनोगतातून संस्थेला ही संधी दिल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे आभार व्यक्त केले. सुनील गावंड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यामुळे मुलांचे मनोबल वाढते तसेच मुले शिक्षणापासून वंचित राहत नाहीत व शिक्षणाची जीवन ज्योत अखंड तेजोमय ठेवण्याचे काम आमची संस्था करीत राहील असे व्यक्त केले. कविता गावंड यांनी आपल्या मनोगतातून शालेय प्रगती संदर्भात पालकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असताना मराठी शाळेमधून विद्यार्थी कुठल्या स्तरापर्यंत किंवा कुठल्या पदापर्यंत जाऊ शकतात याची उत्तम माहिती विद्यार्थ्यांना दिली.

या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हितेंद्र म्हात्रे, सहाय्यक शिक्षक रमेश पाटील, गावंड कुटुंबातील सदस्य नितीन गावंड, डॉक्टर संदेश गावंड , डॉक्टर नंदिनी गावंड, सुनील गावंड, नामदेव गावंड, गणेश गावंड, अनिल गावंड, संदीप गावंड, नवनीत गावंड, साईनाथ गावंड, रुपम गावंड, राजेश्वर गावंड, सहाय्यक शिक्षक विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले व सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version