checmical industry in Raigad

आपण जर रोजगारासंदर्भात पाहिलं तर वडखळ पासून खाली दक्षिण रायगड महाडपर्यंत MIDC फक्त केमिकल प्लॅन्टसाठीच कंपनी उपलब्ध आहेत. इतर कोणतीही इंडस्ट्री संदर्भात कंपनी किंवा कामे अजूनही उपलब्ध नाहीत. रायगडमध्ये पाऊस चांगला आहे, पीक तसेच आंबा काजू आणि इतरही बरीचशी फळ-झाडे पहायला मिळतात मग फूड इंडस्ट्रीसुद्धा आणली जाऊ शकत होती परंतु केमिकल झोनच का डिक्लेअर केला गेला आहे?

“रायगडकरवासियांना रोजगार हवाच! केमिकल कंपनी फार पूर्वीपासून म्हणजे १९७० पासून रायगडमध्ये आहेत परंतु काही बाबी लक्षात घेता कामगारांची सेफटी, रायगडचे भौगोलिक होणारे नुकसान, वातावरणातील बदल, प्रदूषणात झालेली वाढ यासंदर्भात उपाययोजना फारच कमी आहेत.”

धाटाव-रोहा येथे MIDC ने १९७० साली केमिकल इंडस्ट्री झोन डिक्लेअर केला. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकप्रकारे आनंदच झाला होता कारण लोकांना आता रोजगार मिळणार होता. मुख्यत्वे शेती आणि फळझाडे यांव्यतिरिक्त काहीही रोजगार उपलब्ध नव्हता. आपल्या स्थानिक लोकांना केमिकल इंडस्ट्रीचे काही ज्ञान उपजत नव्हते, परंतु इतर प्रांतातून आलेले लोक, त्यांचा अनुभव आणि ट्रेनिंगमुळे आपले लोक हळू हळू काम शिकू लागले. कौलारू घरात राहणार आपला माणूस आता हळूहळू फ्लॅटमध्ये राहायला लागू लागला, दुचाकी-चारचाकी घेऊन फिरू लागला आणखी काय हवं होत.

अनेक कंपन्या सुरु झाल्या आणि आपले स्थानिक लोक आता काम करू लागलेले. मग केमिकल क्षेत्रातील शिक्षणच मिळेल अशी कॉलेजेस काढली गेली किंवा आधीच्याच कॉलेजमध्ये केमिकल क्षेत्रातील शिक्षणे सुरु केली गेली. कारण त्याव्यतिरिक्त D.Ed शिक्षण घेऊन शिक्षक बनण्याकडेच जास्त कल होता किंवा इतर उद्योग जिल्ह्यात उपलब्ध नव्हतेच.

“पूर्वी ST बस वगळता इतर वाहने दुर्मिळच, त्यामुळे रोहा-कोलाड रस्ता फक्त आणि फक्त सायकलींनी गजबजलेला असायचा.

अनेक कंपन्या आल्या काही बंदसुद्धा पडल्या परंतु रोजगार उपलब्ध झाले आणि स्थानिकांना नोकरी मिळत होत्या त्यामुळे एकप्रकारे कोणतीही इंडस्ट्री आली याचा काही फरक पडत नव्हता. काळ बदलत गेला, उत्पादनांची मागणी वाढत गेली, त्यामुळे नवीन उपकरणे बसविली गेली, २४ तास कंपनीचे प्लांट्स सुरु ठेवणे चालू झाले. रोजगार वाढत चालले, परंतु हळू-हळू का होईना हवेचे- पाण्याचे प्रदूषण वाढत चाललेय.

रायगड किंवा कोंकणमध्ये जास्त भातशेती केली जाते, मासे पकडले जातात आणि त्याव्यतिरिक्त आंबे-काजू, फणस, नारळ-सुपारी यांचे उत्पादन घेतले जाते. छान अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे. परंतु जर कोकणचा ऱ्हास थांबायचा असेल तर आता टुरिझम, फलोत्पादन, फूडप्रक्रिया व पॅकेजिंग इंडस्ट्री आणली तर निसर्गाचा ऱ्हास रोखून रायगडवासीयांना पर्यावरणपूरक रोजगार उपलब्ध होऊ शकतात.

जस केमिकल कंपन्या आल्या तेव्हा समाजात बदल घडले तसेच बदल घडतील. उदाहरणार्थ, शाळा-कॉलेजमध्ये फूड-इंडस्ट्रीबद्दल शक्षणे उपलब्ध होतील, मागणी वाढत असेल तर शेतकरी भट, मासे, फळांचे उत्पादन वाढवेल आणि महत्वाचे म्हणजे परप्रांतीयांना जमीन विकणे बंद होईल. जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही हा गैरसमज दूर होईल. फ्रुट जाम, काजू, लोणची आणि इतर बऱ्याच प्रकारची कामे महिलांनासुद्धा उपलब्ध होतील.

अलीकडेच स्फोट किंवा आग लागल्यामुळे अनेक कामगार प्राणाला मुकलेत काही कायमचे अपंग झालेत. वातावरणात बदल, नद्यांचे पाणी काळपट आणि केमिकलयुक्त होत चालले आहे. मासे मरत आहेत. दूषित पाण्यामुळे किडनी फेल, इतर पोटाचे भयंकर आजार उद्भवत आहेत.

प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास वाढत आहेत, भयंकर तापमानवाढ झालेली आपण पाहत आहोत. मुळात जर आपण आणखी वेळ घालवला तर अजूनही दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. म्हणूनच आपल्याकडे ज्या नैसर्गिक बाबी उपलब्ध आहेत त्यांच्याकडेच महत्व वाढवून भौगोलिक परिस्थिती आणि निसर्गाचे संवर्धन करू शकतो.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version