उरण दि 3(विठ्ठल ममताबादे)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या नेतृत्वांखाली उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत , उरण शहर अध्यक्ष धनंजय भोरे , द्रोणागिरी शहर रितेश पाटील,उपतालुकाध्यक्ष राकेश भोईर , विभागध्यक्ष बबन ठाकूर, अनिल गावंड , ठाकूर , या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहर उपाध्यक्ष आणि गाव तिथं शाखा ह्या अभियान अंतर्गत फुंडे गाव शाखेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
द्रोणागिरी शहर उपाध्यक्ष पदी – समीर म्हात्रे,फुंडे शाखा अध्यक्ष पदी रोनीत म्हात्रे तर फुंडे शाखा उपाध्यक्ष पदी दिवेश म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या हस्ते उरण मधील कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group