तळा शहरातील चंडिका देवीच्या प्रांगणात दिनांक 18 सप्टेंबर रोजी तळा येथील नगरसेवक, व्यापारी, शहरातील प्रमुख तसेच काही नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. शहरात उसळणारी गर्दी आणि वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेवून आठवडाभर शहर बंद ठेवण्याचा निर्णय सर्वांनुमतेे घेण्यात आला आहे.
त्यामुळे रविवार, दि. 20 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजल्यापासून ते 27 सप्टेंबरपर्यंत तळा बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तशी माहिती नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांनी दिली आहे.