तब्बल 3 वर्षांनी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पुल आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. शुक्रवार (20 ऑक्टोबरपासून दोन व चार चाकी हलक्या वाहनांचे वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे मंडणगड आणि दापोली तसेच माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. तब्बल 3 वर्षे या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
बॅ. ए. आर. अंतुले यांच्या कारकीर्दीत 1978 साली हा पूल उभा राहिला. या पुलामुळे रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हयातील दळणवळण सुलभ झाले. हा पूल धोकादायक झाल्याने महाविकास आघाडीच्या काळात त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी तब्बल 12 कोटी रूपये खर्च करून पूलाची दुरूस्ती करण्यात आली. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हा पूल पुन्हा वाहतूकीसाठी खुला केला. परंतु काही महिन्यातच पूल पुन्हा वाहतूकीस धोकादायक बनल्याचे लक्षात आल्याने पुन्हा एकदा या पूलावरून वाहतूक बंद करण्यात आली.
आंबेत पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे आंबेत पुलावरून वाहतूक थांबली होती. या खाडीत दळणवळणासाठी फेरीबोट ठेवण्यात आली आहे. सुरवातीला वाहनासाठी भाडे आकारले जायचे. त्यानंतर मोफत सेवा देण्याचे ठरले. गेली वर्षे या सावित्री खाडीतून फेरीबोटीमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली.
पूल वाहतूकीसाठी बंद असल्याने शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत होते. आतापर्यंत या पुलाच्या दुरुस्तीवर तब्बल 28 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. आता या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालं आहे. पुलाच्या वाहतूक क्षमतेची चाचणी यशस्वी झाली असून त्यानंतरच हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Cannot collect videos from this channel. Please make sure this is a valid channel ID.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
