रेवदंडा येथे वयोवृद्धांना लक्ष्य करून घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रेवदंडा पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरविले, उपनिरीक्षक नंदगावे आणि त्यांच्या टिमचे सर्वत्र कौतुक होत आहे. तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी विनित चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.



सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरविले यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. विविध पथके तयार करून चोरट्यांचा शोध सुरू केला. अखेर, रेवदंड्यातील एका इसमाला पोलिसांनी संशयित म्हणून शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि पोलिसांच्या दणक्याने तो बोलू लागला. त्यानेच घरफोडी केल्याचे कबूल केले आणि जून महिन्यात झालेल्या चोरीतही त्याचा सहभाग असल्याचे सांगितले. आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



वयोवृद्धांमध्ये भितीचे वातावरण मागील काही दिवसांपासून निर्माण झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून घरफोडीच्या दोन्ही गुन्ह्यांची उघडकी केली. याबद्दल रेवदंडा पोलिसांचे वयोवृद्धांकडून कौतुक केले जात आहे.





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version